खाली सरकवा
ठळक बातम्या
श्री. सनी परदेशी
श्री. विजय कोलते
आशिष गोगावले
प्रसाद बांदेकर
श्री. संजय भगते
सचिन शेलार
श्री. विनोद कांडेकर
प्रशांत चव्हाण
दिपेश कांबळे
विनोद राणे
आकाश पाटील
रोहन गोवेकर
तुषार बोरगावकर
प्रशांत रंगारी
मयूर पेंडकलकर
मनोज आचारी
सुधीर खरात
गणेश बालचिम
श्याम महाजन
गंगाराम सुरनार
विनायक नानारकर
सुजित गोरे
विनोद भोईर
शिवाजी महाडिक
संदीप माने
संदीप पवार
कार्यक्रम विभाग
स्वागत आहे
स्थानीय लोकाधिकार समिती
शिवसेनेची सर्वात महत्वाची संलग्न संघटना म्हणून स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ परिचित आहे. बँक ऑफ बरोडा स्थानीय लोकाधिकार समिती ही स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाशी संलग्न आहे. बँक ऑफ बरोडा स्थानीय लोकाधिकार समिती ही एक प्रभावशाली संघटना आहे. स्थानीय कर्मचाऱ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध समिती नेहमीच आवाज उठवत असते. आस्थापनांमध्ये चुकीच्या मार्गाने होणाऱ्या नोकर भरतीवर समितीची नेहमीच करडी नजर असते.सरकारने भूमिपुत्रासाठी 80 % जागा राखीव ठेवल्या आहेत,त्याचं काटेकोर पालन व्हावं यासाठीही समिती वेळोवेळी कायदेशीर मार्गाचाही वापर करत असते. मराठी भाषेचं बँक ऑफ बरोडा महत्व टिकवून ठेवण्याचं महत्वपूर्ण काम समिती बजावत असते. बँक च्या फॉर्म्स, बोर्ड आणि बँकेचे पत्रव्यवहार आणि संभाषण मराठी मध्ये असावे यासाठी समिती आग्रही असते. मराठी भाषेचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान मराठी भाषा पंधरवडा साजरा केला जातो. या पंधरवड्या मध्ये निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा अश्या विविध प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात.अमराठी अधिकाऱ्यांसाठी मराठी भाषेचे वर्ग चालवले जातात. दरवर्षी 27 जानेवारी मराठी भाषा दिन साजरा होतो त्यामध्ये स्थानीय लोकाधिकार समिती भाग घेत असते. या समारंभाला शिवसेना पक्षप्रमुख, शिवसेना खासदार, आमदार, शिवसेना वरिष्ठ सोबत सर्व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. तसेच शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्य दरवर्षी बँक कर्मचाऱ्यांसाठी क्रिकेट स्पर्धा, कॅरम स्पर्धा, बुद्धिबळ स्पर्धा अश्या विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते बँक ऑफ बरोडा मध्ये भरती साठी संपूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या तरुण तरुणींना कागद पत्र तपासणी, आरोग्य तपासणी, सोयीच्या शाखा मिळण्यासाठी, चांगली राहण्याची सोय होण्यासाठी मदत केली जाते.