Event Detail

छत्रपति राजर्षी शाहू महाराज जयंती
06/26/2020
|
कोल्हापूर

श्री विवेक चौधरी यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री विवेक चौधरी यांनी समाजातील दुर्लक्षित आणि मागासलेल्या घटकांना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शाहू महाराजांनी केलेल्या कार्याची आठवण करून देत आजच्या परीस्थितहि शाहू महाराजांचे विचार तंतोतंत लागू पडत असल्याचे म्हंटले. ते पुढे म्हणाले, "बँक ऑफ बडोदा छत्रपति राजर्षी शाहू महाराज यांच्या कार्यास सलाम करते तसेच त्यांचे विचार अंगीकृत करण्याचा निश्चय आज या
कार्यक्रमाच्या निम्मिताने आम्ही करत आहोत". तसेच त्यांनी बँक ऑफ बडोदा स्थानीय लोकाधिकार समिती आणि ऑल इंडिया बँक ऑफ बडोदा कर्मचारी सेना युनिअनचे कौतुक केले.
सादर कार्यक्रमाच्या निम्मिताने बँक ऑफ बडोदा शिवाजी चौक शाखेचे शाखाप्रमुख श्री प्रखर कुमार, शाहपुरी शाखेचे शाखाप्रमुख श्री सचिन देशमुख तसेच ऑल इंडिया बँक ऑफ बडोदा कर्मचारी सेनेचे पदाधिकारी श्री विशाल नलावडे, श्री भरत पाटील, श्री पराग कुलकर्णी, श्री अमोल पाटील, श्री रोहन पाटील, श्री आशिष रामटेके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रशांत तावरे यांनी केले.