Event Detail

बँक ऑफ बरोडा स्थानीय लोकाधिकार समिती च्या वतीने आरोग्य शिबीर आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन
|
नवी मुंबई

मुंबई : हिंदूहृदयसम्राट शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे त्यांच्या जयंती निमित्ताने बँक ऑफ बरोडा स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीने बँक ऑफ बरोडा भांडुप कर्मचारी वसाहत या ठिकाणी 8 फेब्रुवारी रोजी आरोग्य शिबीर आणि नेत्र तपासणी शिबीर आयोजन करण्यात आले होते .

तसेच बँक ऑफ बरोडा स्थानीय लोकाधिकार समिती च्या सूचना फलकाचे उदघाट्न भांडुप विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. रमेश कोरेगावकर यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी बँक ऑफ बरोडा कर्मचारी सेनेचे जनरल सेक्रेटरी श्री. विनोद निकम आणि बँक ऑफ बरोडा स्थानीय लोकाधिकार समिती चे जनरल सेक्रेटरी श्री. पंकज केरकर उपस्थित होते.
याप्रसंगी बँक ऑफ बरोडा चे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.