Event Detail
बँक ऑफ बरोडा स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी
दरवर्षी "शिवसेना" तिथीनुसार शिवजयंती महोत्सव मोठ्या थाटामाटात राज्यभर साजरा करत असतें.आणि गेली ऐनेक वर्ष मुंबईतील 'फोर्ट' भागामध्ये शिवसेनाप्रणित स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून शिवराय संचलनाचे आयोजन केले जाते.त्यामध्ये शिवसेना आमदार, खासदार सोबत ऐनेक नेते उपस्थित असतात.यावर्षी दस्तुरखुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे उपस्थित राहणार होते.पण देशावर आलेल्या कोरोना च्या संकटामुळे गर्दी टाळण्यासाठी हा नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आला.
बँक ऑफ बरोडा स्थानीय लोकाधिकार समितीच्या वतीने बँक ऑफ बरोडा, मुंबई मेन ऑफिस, फोर्ट येथे शिवजयंती महोस्थव साजरा करण्यात आला. फोर्ट सारख्या कॉर्पोरेट भागामध्ये महाराज्यांच्या पोवाड्यामुळे सकारात्मक ऊर्जा पसरली होती.यावेळी बँक ऑफ बरोडा स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष श्री. विनोद निकम आणि सरचिटणीस श्री.पंकज केरकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन करण्यात आले.याप्रसंगी श्री. विनोद निकम यांनी महाराज्यांच्या कार्याचे धडे देऊन उपस्थित कार्यकर्त्यांना प्रेरित केले.
याप्रसंगी कर्मचारी सेना महासंघाचे सरचिटणीस श्री. विलास घुगरे,बँक ऑफ बरोडा मुंबई झोन चे महाप्रबंधक सत्यनारायण राजू,उप महाप्रबंधक श्री.पटनायक, सहायक महाप्रबंधक (मानव संसाधन) ललित मोहंता यांनी कार्यक्रम स्थळी भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून वंदन केले. यावेळी ऑल इंडिया बँक ऑफ बरोडा कर्मचारी सेनेचे अध्यक्ष श्री.जयवंत गोलतकर, महिला आघाडीच्या प्रमुख सौ. माया परांजपे सोबत मोठ्याप्रमाणात पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम नियोजनपूर्व आणि उत्साहपूर्वक पार पडला.