General Secretary
श्री.पंकज केरकर
(सरचिटणीस बँक ऑफ बरोडा स्थानीय लोकाधिकार समिती)
अगदी तरुण वयातच आपल्या संघटन कौशल्याची चुणूक दाखवून "बँक ऑफ बरोडा स्थानीय लोकाधिकार समितीच्या " सरचिटणीस पदाची धुरा खांद्यावर घेऊन ती अलगद पेलणार नेतृत्व म्हणजे "श्री.पंकज केरकर".
मराठी भाषा बँकेच्या कामकाजात समाविष्ठ करण्यासाठी व्यवस्थापनाशी दोन हाथ करणारा "पंकज",
बँकेत होणाऱ्या कर्मचारी भरती मध्ये स्थानीय तरुण /तरुणींना प्राधान्य मिळावे यासाठी व्यवस्थापनाला जाब विचारणारा" पंकज",
मराठी भाषेचं महत्व वाढावं यासाठी कर्मचाऱ्यांसाठी विविध स्पर्धा आणि कार्यक्रम आयोजित करणारा "पंकज",
हिंदुहृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्य विविध कार्यक्रम आयोजित करणारा कट्टर शिवसैनिक "पंकज ",
कोरोना महामारीच्या काळात कोरोना सदृश्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता धावणारा समाजसेवक "पंकज",
कोणत्याही कर्मचाऱ्याच्या मदतीसाठी तत्पर हजर असणारा "पंकज",
भांडुप कर्मचारी वसाहती मध्ये रहिवाश्याच्या प्रत्येक समस्येवरचा एकच उपाय म्हणजे "पंकज",
सर्वसामान्य कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्कासाठी काहीही करायची तयारी असणार "पंकज",
"ऑल इंडिया बँक ऑफ बरोडा कर्मचारी सेनेचे" मुख्य उपसरचिटणीस पदाची जबाबदारी अतंत्य प्रभावी पणे पेलणारा "पंकज"
नेतृत्व, कर्तृत्व यांचा अनोखा संगम असणारे पंकज केरकर आपल्या कुशल नेतृत्वात" बँक ऑफ बरोडा स्थानीय लोकाधिकार समितीचे " कार्य महाराष्ट्रभर पसरवत आहेत.