President
श्री. विनोद निकम
(उपसचिव, बँक कर्मचारी सेना महासंघ)
कट्टर शिवसैनिक, ऑल इंडिया बँक ऑफ बरोडा कर्मचारी सेना सरचिटणीस,बँक कर्मचारी सेना महासंघ उपसरचिटणीस हे सर्व सोडून श्री. विनोद निकम यांची आणखीन एक ओळख म्हणजे "बँक ऑफ बरोडा स्थानीय लोकाधिकार "समितीचे अध्यक्ष.
बँक ऑफ बरोडाच्या कर्मचाऱ्यांच्या न्यायहक्कासाठी सगळ्या सीमा पार करण्याची नेहमीच त्यांची तयारी असते. भूमिपुत्रावर वेळोवेळी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध नेहमीच ते आवाज उठवत आले आहेत.बँके मध्ये होणारी सहायक आणि क्लर्क च्या भरतीमध्ये स्थानीय मराठी भाषिक तरुण /तरुणी असाव्यात या साठी त्यांचा नेहमीच आग्रह असतो. त्यासाठी त्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये आंदोलनाचे हत्यार ही उपसले आहे. त्याचाच परिणाम म्हणून आज बँक ऑफ बरोडा मध्ये मोठ्या प्रमाणात मराठी भाषिक तरुण /तरुणी कार्यरत दिसत आहेत.